मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) दिंडोरी रोड परिसरात घरफोडी २) शहरात दोघांची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 25, 2023 | 5:18 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पाच लाखाचा ऐवज चोरुन नेला. दिंडोरी रोड परिसरात ही घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राजेंद्र श्रीवास्तव (५० रा. मिलेनियम पार्क दिंडोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. श्रीवास्तव कुटुंबिय बुधवारी (दि.२३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ९७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.

वेगवेगळया भागात दोघांची आत्महत्या
शहरात गुरूवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्येत ६२ वर्षीय वृध्दाने दुर्धर आजारपणास कंटाळून आत्महत्या केली असून ५८ वर्षीय महिलेचे आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना पाथर्डी फाटा भागात घडली. लिलाबाई अर्जुन मते (५८ रा.ओमकार अॅनेक्स,मुरलीधरनगर) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केल्याचे बोलले जाते. ही बाब निदर्शनास येताच मुलगा देविदास मते यांनी त्यांना तातडीने नजीकच्या वक्रतुंड हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.सागर मंडलिक यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.

दुसरी घटना आनंदवली परिसरात घडली. येथील सुरेश बाळू बोरस्ते (६२ रा.शिवनगर) हे कर्करोगाने त्रस्त होते. गुरूवारी (दि.२४) या दुर्धर आजारपणास कंटाळून त्यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मनोहर महाले यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Dindori Road Anandvali Pathardi Phata

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड-नांदगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी… असा होणार फायदा… (व्हिडिओ)

Next Post

नाशिकच्या इनोव्हा कारची मध्य प्रदेशात विक्री… तिघे गजाआड… असा घडला सर्व गुन्हा…

India Darpan

Next Post
crime 1234

नाशिकच्या इनोव्हा कारची मध्य प्रदेशात विक्री... तिघे गजाआड... असा घडला सर्व गुन्हा...

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011