नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना कामटवाडे शिवारात घडली. या घरफोडीत सोने चांदीच दागिने चोरीला गेले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता चंद्रशेखर शेरेकर (रा.शिवगंगा सोसा.त्र्यंबकेश्वरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेरेकर कुटुबिय २ ते ९ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख १५ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
जुगार खेळणारे गजाआड
जुगार खेळणा-या व खेळविणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागनाथ बापूराव लिंगायत (५१, रा. जाधव संकुल) व सुनंदाबाई खंडू खंदारे (५५, रा. अशोकनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
अशोकनगर येथील महिंद्रा मटेरियल गेटवर उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.७) सापळा लावण्यात आला होता. मटेरियल गेट समोरील भेंडीच्या झाडाखाली दोघेही पैसे लावून मटका जुगार खेळतांना व खेळवितांना आढळून आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या ताब्यातून सुमारे साडे तीन हजाराची रोकड,जुगाराचे साहित्य व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अंमलदार अनंता महाले यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Dacoity Police