नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दरोडा टाकण्याच्या हेतूने आलेल्या टोळीला गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी काठे गल्ली सिग्नल जवळ अटक केली. विशाल राजभर, अजय हिरामण, राठोड दानिश रशीद मणियार, नसिरुद्दीन फरुद्दीन शेख यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या टोळीकडून एक पिस्तूल तसेच घरफोडी करणारे हत्यारे, दरोडे टाकण्यासाठी लागणारे हत्यार, काडतुस आदी जप्त केले आहे. हे सर्व संशयित आरोपी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आहेत. यातील संशयित आरोपी असलम शेख यावर यापूर्वी जळगाव मध्ये तडीपारीची कारवाई झालेली आहे.
राज्यातील पोलीस ज्या टोळीचा शोध घेत होते ती टोळी अखेर पोलिसांना मिळाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे करणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. त्यांचा शोध लागत नव्हता. अखेरीस या टोळीला भद्रकाली पोलिसांनी अतिशय शिताफीने गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल जवळ अटक केली अशी माहिती किरणकुमार चव्हाण (पोलिस उपायुक्त नाशिक) यांनी दिली.