नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ७१ हजाराचे दागिने लंपास केले आहे. हिरावाडीतील शिवकृपानगर भागात ही घरफोडी झाली. याप्रकरणी महेश चंद्रकांत आपटे (रा.श्री विश्वास पार्क,दत्तमंदिराजवळ शिवकृपानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत आहेत. आपटे सोमवारी (दि.२१) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे ७० हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास जमादार वनवे करीत आहेत.
मखमलाबादला कोयता बाळगणाऱ्यांवर कारवाई
खमलाबाद गावात धारदार कोयता बाळगणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. राहूल बाळासाहेब पिंगळे (रा.गामणे मळा,म.बाद) व शंभू सोमनाथ रायकर (रा.शांतीनगर,म.बाद) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईत कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबाद येथील बसस्टॅण्ड परिसरात फिरणा-या दोघांकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२१) रात्री ही कारवाई करण्यात आली. स्टॅण्डसमोरील मंदिर परिसरातील मोकळय़ा मंदिरावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात धारदार कोयते मिळून आले. याबाबत अंमलदार प्रशांत देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी शस्त्र बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक वसावे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime dacoity arrest Makhmalabad Hirawadi