नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील पोलिसांची खांदेपाटल केली आहे. पोलिस स्टेशन प्रमुखांच्या बदल्यांनंतर आता पोलिस आयुक्तांनी कोम्बिंग ऑपरेशनचे शस्त्र हाती घेतले आहे.
नाशिकमध्ये मध्यरात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची शोध मोहीम हाती घेतली. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने होणारे हल्ले आणि हत्या या घटनेत वाढ झाली आहे. तसेच कोयता गँगची देखील दहशत वाढल्याने नाशिक पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.
नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबली नाही, तर नागरिकांच्या वतीने रस्त्यावर उतरू असा इशारा पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यानंतर आता नाशिक पोलीस रस्त्यावर उतरले असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांची शोध मोहीम सुरू केली आहे.
Nashik City Crime Control Police Combing Operation