नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील होलाराम कॉलनी परिसरात प्रियकराने विवाहितेची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता सिडकोत निघृण खून झाल्याची बाब समोर आली आहे. म्हणजेच, दिवसभरात दोन हत्या झाल्याने शहरातील गुन्हेगारीबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
नवीन सिडको परिसरात मयूर केशव दातीर (वय २२) या युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. अंबडच्या स्वामी नगरातील समाज मंदिर परिसरामध्ये हा खून झाला. आठ दिवसापूर्वीच संजीव नगर भागात दोन युवकांचे खून झाले होता. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली. धारदार शस्त्राने हा खून करण्यात आला आहे.
मयूर दातीर यांची मोटरसायकल घटनास्थळी आढळून आलेली आहे. या मोटरसायकवर रक्ताचे डाग पडलेले होते. दरम्यान खून करणारा युवक देखील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ हे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संताप आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
nashik city crime Cidco Youth Murder