नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहा लाखास गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी राहूल बापू पाटील (रा. पोकार कॉलनी, दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. वेगवेगळया बँक खात्यात ही रक्कम भरण्यास भाग पाडून हा गंडा घालण्यात आला आहे.
२३ जुलै रोजी ९६६९४९६२२८ या मोबाईल धारकाने पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. अल्गो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे संबधितांनी आमिष दाखविल्याने पाटील त्याच्या भुलथापांना बळी पडले. ७४१५०१०२५१ या व्हॉटसअपवरून भामट्याने त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत एचडीएफसी आणि युनिटन बँक खात्यावर त्यांना पैसे टाकण्यास भाग पाडले. ३ ऑगस्ट दरम्यान पाटील यांनी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यांवर ५ लाख ७३ हजार ३५० रूपयांची रक्कम भरली. मात्र त्यानंतर संशयिताने ट्रेंडीगच्या माध्यमातून शेअरमार्केट मध्ये गुंतवणुक न करताच परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आल्याने पाटील यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
चुंचाळेत चाकूच्या धाकाने युवकाला लुटले
औद्योगिक वसाहतीत चुंचाळे परिसरात चाकूचा धाक दाखवत दोघांनी तरूणास लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी युवकाच्या खिशातील सुमारे सतराशे रूपयांची रोकड बळजबरीने काढून मारहाण केली. त्यानंतर हे दोघेही फरार झाले. याप्रकरणी दत्तू सखाराम रसाळ ( रा.आंबेडकरनगर,वरचे चुंचाळे) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
नवनाथ साळवे उर्फ डॉलर (रा.आंबेडकरनगर,वरचे चुंचाळे) व सुनिल ताठे उर्फ घा-या अशी तरूणास लुटणा-या संशयितांची नावे आहेत. रसाळ गुरूवारी (दि.३१) परिसरातील महापालिका शाळा भागात गेला असता ही घटना घडली. शाळे जवळील मोकळय़ा मैदानावरून पायी जात असतांना दोघा संशयितांनी त्यास अडविली. यावेळी चाकूचा धाक दाखवत दोघांनी त्यास दमदाटी व मारहाण करीत त्याच्या खिशातील १ हजार ७०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुघले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Cheating Youth Loot