नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट दस्त ऐवजाच्या आधारे दस्तनोंदणी करुन सभासदांची तब्बल चाळीस लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीच्या पुनर्निमितीत सदस्यांना विश्वासात न घेता महापालिकेचा मंजूर प्लॅन बदलून व नव्याने तयार केल्याचा प्रकारही यात समोर आला आहे.
याप्रकरणी आरिफ अमीर अरब (रा.महागिरी ठाणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अरूण दादाजी आहेर, भावना अरूण आहेर, आशिष अरूण आहेर, प्रविण प्रभाकर पाठक व मारूती तानाजी गडकरी (रा.सर्व निलेश अपा.कुलकर्णी गार्डन मागे,शरणपूर रोड) अशी सदस्यांची फसवणूक करणा-या संशयितांची नावे आहेत.
अरब यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्र्यंबकरोडवरील हिंद को.ऑप हौ.सोसायटी पुननिर्मिती करण्यासाठी संशयितांनी २००४ ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान महापालिकेचा मंजूर प्लॅन बदलून नवीन प्लॅन तयार केला. यावेळी बनावट ठराव करून सदरची जागा प्रविण पाठक यांच्या नावे खरेदी केल्याचे बनावट दस्त नोंदणीकृत करून सदस्यांची ४० लाखाची फसवणुक केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.