नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईलच्या माध्यमातून कंपनीची माहिती चोरल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी सोडलेली असतांना संबधितांनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे. ही माहिती घेऊन या दोघांनी दुसऱ्या कंपनीची स्थापना केली. कमलेश महाजन आणि चंद्रकांत घरटे अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी अभिजीत अनिल भावे (रा. तपोवनरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. भावे यांच्या अॅशग्राफ टेक्नॉलॉजी प्रा.लि. व प्राईफ ग्राफाईट प्रा.लि. या कंपनीमध्ये संशयित नोकरीस होते. कंपनीच्या कामकाजासाठी संशयितांना मोबाईल फोन पुरविण्यात आले होते. संबधितांना राजीनामा देवून नोकरी सोडलेली असतांना कंपनीस मोबाईल परत केले नाही.
डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या काळात संशयितांनी कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपवरील गोपनिय माहिती चोरून तसेच त्याच्या माहितीच्या आधारे स्व:ताच्या नावे आरवीश टुलिंग प्रा.लि. ही कंपनी स्थापन करून भावे यांच्या कंपनीची फसवणुक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ. कोल्हे करीत आहेत.