नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेतनानगर भागात रस्त्याने पायी जाणा-या वृध्द महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या घटनेत ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र भामट्यांनी लांबविले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमल बाबुराव कांबळे (६८ रा.देवीमंगल अपार्टमेंट, चेतनानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कांबळे या गुरूवारी (दि.१७) फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील कॉलनीरोडने त्या फेरफटका मारीत असतांना तेजस बिल्डींग समोर समोरून अॅक्टीव्हावर आलेल्या अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
युवकाची राहत्या घरात आत्महत्या
२२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना देवळाली गावात घडली. रूपेश संतोष कर्डीले (रा. सुवर्णा सोसायटी, आर्टीलरी सेंटर रोड, देवळाली गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. रुपेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रूपेश कर्डीले याने गुरूवारी (दि.१७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्याच्या कडीला कापड बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सुजीत कर्डीले याने त्यास तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
-Chain Snatching Suicide