एटीएम कार्डची आदलाबदल ५० हजार लांबविले
नाशिक – सीडीएम मशिन मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेस मदतीचा बहाणा करून भामट्यांनी एटीएम कार्डची आदलाबदल करीत बँक खात्यातील ५० हजाराची रोकड परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमला प्रसाद जयस्वाल (रा.अश्विनीनगर,नामको हॉस्पिटल मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जयस्वाल या गेल्या बुधवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोड येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठी गेल्या होत्या. मात्र रोकड त्यांना सीडीएम मशिन मध्ये भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्या एटीएम कक्षात गेल्या असता ही घटना घडली. सीडीएम मशिन मध्ये पैसे टाकत असतांना दोघा भामट्यांनी मदतीचा बहाणा केला. यावेळी भामट्यांनी एटीएम कार्डची आदलबदल करून पोबारा केला. काही वेळातच पैसे काढल्याचा मॅसेज आल्याने हा प्रकार समोर आला असून भामट्यांनी अन्य एटीएम मशिनच्या माध्यमातून जयस्वाल यांच्या बँक खात्यातील ४९ हजार रूपये परस्पर काढून घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.
विनयनगरला महिलेची पोत खेचली
नाशिक – फेरफटका मारून घराकडे परतणाºया महिलेच्या गळ््यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना विनयनगर येथे घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा सचिन कदम (रा.पोलीस चौकी मागे,विनयनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कदम या शुक्रवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातून फेरफटका मारून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. राम मंदिर कॉर्नर येथून त्या पायी जात असतांना समोरून येणाºया दुचाकीस्वारांने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.
…
पखालरोडवर रिक्षामधून आलेल्या चौघांनी तरूणास लुटले
नाशिक – मित्राची वाट बघत रस्त्यात उभ्या असलेल्या तरूणास चाकूचा धाक दाखवित चौघांनी लुटल्याची घटना पखालरोड भागात घडली. रिक्षातून आलेल्या भामट्यांनी तरूणाचा मोबाईल आणि खिशातील दहा हजाराची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानचंद रामचंद जैस्वाल (२६ रा.साईबाबा मार्केट उपनगर) या तरूणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जैस्वाल शुक्रवारी (दि.१) मित्र आसिफ सय्यद यास भेटण्यासाठी पखालरोड भागात गेला होता. दर्ग्यावळ तो आपल्या मित्राची वाट बघत उभा असतांना ही घटना घडली. एमएच १५ एके ५६२० या रिक्षातून आलेल्या चालकासह तिघांनी त्यास चाकूचा धाक दाखवत दमदाटी केली. यावेळी जैस्वाल याच्या खिशातील दहा हजाराची रोकड आणि मोबाईल हिसकावून घेत भामट्यांनी पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
विधातेनगरला ६६ हजाराची घरफोडी
नाशिक – रविशंकर मार्गावरील विधातेनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ३२ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईकानाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा वाल्मिक दराडे (रा.विजय सोसा.कोणार्क कॅसल मागे,विधातेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दराडे या शेतीच्या कामानिमित्त गेल्या शनिवारी (दि.२७) मनमाड येथे गेल्या होत्या. चार दिवसानंतर त्या घरी परतल्या असता ही घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड व सोन्याचे दागिणे असा सुमारे ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.