नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि.१८) देवळाली कॅम्प परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात एका १८ वर्षीय तरूणासह ६२ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
संसरी लेन भागात राहणारे श्रावण गंगाराम काकडे (६२ रा.राव बंगला,संसारी लेन,दे.कॅम्प) यांनी शुक्रवारी अज्ञात कारमातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा विजय काकडे याने त्यांना तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.रूपाली राठोड यांनी मृत घोषीत केले. दुसरी घटना लहवित येथील पाळदे मळा भागात घडली. संस्कार संतोष खडांगळे (१८ रा.ग्रामपंचायत जवळ लहवित ता.जि.नाशिक) हा युवक शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाळदे मळा भागातील वाडीचे राण येथे राहणाऱ्या आपल्या आजीला भेटण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास त्याने घरासमोरील आंब्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत चुलत भाऊ संजय खडांगळे यांनी खबर दिला आहे. दोन्ही घटनांप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळ््या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार आडके व जमादार पाचोरे करीत आहेत.
उभ्या बसमधील बॅटऱ्या लंपास
उभ्या खासगी बसमधील बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना कृष्णनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढीत आहेत. सचिन विष्णू गाडेकर (रा.गाडेकर मळा,नाशिकरोड) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. गाडेकर यांचाय टुर्स अॅण्ड ट्रव्हल्सचा व्यवसाय असून कृष्णनगर येथील जय पॅलेस हॉटेलच्या बाजूला असलेल्या गोदावरी चेंबर्स येथे त्यांचे कार्यालय आहे. गोदावरी चेंबर्स समोर पार्क केलेल्या एका टुर्स अॅण्ड ट्रव्हल्स बसमधील सुमारे ३० हजार रूपये किमतीच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना गुरूवारी (दि.१७) रात्री घडली. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
Nashik City Crime Bus Battery Theft Suicide