नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरणपूर रोड भागात वाहनाचे आरसी बुक मागितल्याच्या कारणातून दोघा भावांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत एकाचा दात तुटल्याने तो जखमी झाला असून, याप्रकरणी भाऊ भावजयीसह पुतण्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष गागरे (४८) अरूणा गागरे (४५) व आदित्य गागरे (१९ रा.गुलमोहरनगर, म्हसरूळ) अशी दात तोडणा-या भाऊ भावजयीसह संशयित पुतण्याचे नाव आहे. याप्रक्रणी प्रशांत भागवत गागरे (४३ रा.श्री तिरूमला ओंकार, सिरीन मिडोज) यांनी तक्रार दाखल केली आहे. संतोष गागरे व प्रशांत गागरे हे सख्खे भाऊ असून ते विभक्त राहतात. मंगळवारी (दि.१८) सायंकाळी दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबियांसह शरणपूररोड येथील पी अॅण्ड टी कॉलनीत नातेवाईकांकडे गेले असता ही घटना घडली.
पाहूणे मंडळीत गप्पा गोष्टी सुरू असतांना प्रशांत गागरे यांच्या पत्नीने वाहनाचे आरसीबुक मागितल्याने हा वाद झाला. संतप्त संशयितांनी अश्लिल शिवीगाळ करीत प्रशांत गागरे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत त्यांचा दात तुटल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
? आलाबाद ग्रामपंचायतीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान…
*असं काय केलं या गावानं…*
जाणून घ्याल तर तुम्हीही थक्कच व्हाल
https://t.co/n1DzncpVOf#indiadarpanlive #kolhapur #alabad #grampanchayat #work #women #empowerment #village— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 20, 2023
Nashik City Crime Brothers Fight Police