नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
पहिली घटना सिन्नर फाटा भागात घडली. रामकृष्ण भिमा घुले (रा.पंचशिलनगर,भगूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घुले यांचे सिन्नरफाटा भागातील महाराष्ट्र माझा हॉटेल पाठीमागे कुशनचे दुकान आहे. रविवारी (दि.२८) ते नेहमी प्रमाणे आपल्या दुकानात गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाबाहेर लावलेली त्यांची प्लॅटीना एमएच १५ जी झेड २३८७ चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना पंचवटीतील स्वामी नारायण नगर भागात घडली. येथे राहणारे संजय गोपाळराव कापडी (रा.संत वंदन अपा.स्वामी नारायण नगर) यांची होण्डा शाईन एमएच १५ ईझेड ५५४३ गेल्या बुधवारी (दि.२४) रात्री त्यांच्या बिल्डीगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.