नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -गंगापुररोड भागात इज्जत काढतो या कारणातून एकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मयुर निकम,रितेश पाटील,आशिश व मोहित सोनवणे अशी तरूणास मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहे. या घटनेत एका तरूणाचा हात मोडला आहे.
याप्रकरणी मिहीर रंजीत कोपीकर (२४ रा.चिंतामणी रेसि.यशवंत कॉलनी कॉलेजरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपीकर गेल्या शुक्रवारी (दि.३०) रात्री बॉबीज हॉटेल भागात गेला असता ही घटना घडली. स्पोटर्स कल्चरल क्लब येथे संशयितांनी त्यास गाठून कोणाची इज्जत काढतो या कारणातून वाद घालत कोपीकर यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाने लाथ मारल्याने कोपीकरचा हात मोडला असून अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.