नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका परिसरात भाडे देण्याच्या वादातून रिक्षाचालकाने दोघा प्रवाशांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत एक प्रवासी जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नानाजी गंगाधर मेहंदळे (४४ रा. कांदिवली, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. मेंहदळे व त्यांचे ओळखीचे प्रकाश नामदेव आहिरे (४१ रा. नायगाव ता. वसई जि.पालघर) या दोघांनी गुरूवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास एका अॅटोरिक्षातून प्रवास केला. व्दारका परिसरातील आई हॉटेल समोर दोघे रिक्षातून खाली उतरले असता ही घटना घडली.
अज्ञात रिक्षाचालकाने दोघांकडे वाढीव प्रवास भाड्याची मागणी केली. यावेळी दोघा प्रवाश्यांनी त्यास वाढीव पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने गैरकायद्याची मंडळी जमवून दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत आहिरे जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.