नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळारोड भागात पुतण्याशी झालेल्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एका काकास बेदम मारहाण केली. या घटनेत फायटरने मारहाण करण्यात आल्याने काका जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अरिफ शेख,आरिफ शेख,झकी शेख,शाहरूक शेख (रा.सर्व वडाळागाव) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद अन्वर अब्दूल रज्जाक खतीब (रा.व्हिनर सोसा.रोझी हॉटेलमागे,वडाळारोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
मोहम्मद खतीब यांच्या मुलाचा संशयितांसमेवत वाद झाला होता. या कारणातून टोळक्याने रविवारी (दि.२१) खतीब यांचे बंधू अझर अब्दूल रज्जाक खतीब (३०) यांच्याशी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत संशयितांनी फायटरने मारहाण केल्याने अझर खतीब जखमी झाले असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.