ं
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एटीएम कार्डाची अदलाबदल करुन एका महिलेला तीस हजाराला गंडा घालण्यात आला. नाशिक रोडला मुक्तीधाम परिसरात ही घटना घडली. या फसवणूक प्रकरणी वंशिका राजेंद्र चव्हाण (वय २३, हरिभक्ती अपार्टमेंट, आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी साडेबारा वाजता स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर ही फसवणूक करण्यात आली. नाशिक रोडला स्टेट बॅकेच्या एटीएम केंद्रावर अज्ञात भामट्याने पैसे काढण्याच्या बहाण्याने ही एटीएम कार्डाची आदलाबदल करुन वंशिका चव्हाण यांच्या खात्यातून ३० हजार रुपये लंपास केले.
सिडकोत धारधार चॅापर घेऊन फिरणारा गजाआड
धारदार चॅापर घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. सिडकोत शिवपुरी चौकात पंडीतनगर भागात हा प्रकार घडला. राशी दहारुन खान (वय १९, पंडीतनगर शिवपुरी चौक) असे संशयिताचे नाव आहे. काल दुपारी चारच्या सुमारास तो धारदार शस्त्र घेउन फिरत असल्याची माहीती अंबड पोलिसांनी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तडीपारावर कारवाई
जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करुनही शहरात फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. अक्षय गणपत गावंडे (वय २१, बाजीप्रभू चौक, सावतानगर) असे तडीपाराचे नाव आहे. आडगाव शिवारात ओझर रस्त्यावरील करण हॅाटेल जवळ काल मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime ATM Theft Cidco