नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्यरात्री चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटर असून या सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी ही घटना घडली.
अगोदर चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी हेत नसल्याने चोरट्यांनी एटीएमच चोरून नेले आहे. या एटीएममध्ये किती रक्कम होती. याबाबत अद्याप निश्चित आकडा समजू शकलेला नाही. मात्र एटीएम चोरणाऱ्या संशयतांचा पोलीस शोध घेत आहे.
सदरची घटना सकाळी नागरिकांना समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात एक पिकअप व स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसली.