नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावरकर नगर येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम केंद्रात कार्डची आदलाबदल करून बँकखात्यातील सुमारे १६ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दादा नामदेव गांगुर्डे (६३ रा.समृध्दनगर हॉटेल अमृत गार्डन जवळ,त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांगुर्डे गेल्या (दि.३१ जुलै रोजी महात्मानगर भागात गेले होते. अशिर्वाद मेडिकल स्टोअर्स जवळील अॅक्सीस बँकेच्या बुथमध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. पैसे काढत असतांना बुथमध्ये शिरलेल्या दोघा भामट्यांनी मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदला बदल केली. त्यानंतर गांगुर्डे यांच्या कार्डचा वापर करीत सुमारे १६ हजाराच्या रकमेवर डल्ला मारला. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
बांधकाम साईटवरून सेट्रींग साहित्य चोरीला
गंगापूररोडवरील पंपीगस्टेशन भागात बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून चोरट्यांनी ५० हजाराचे सेट्रींग साहित्य चोरून नेले असून याप्रकरणी सोमनाथ भिकाजी शेवाळे (रा. केवलपार्क सातपूर) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवाळे यांचे पंपीग स्टेशन भागात सुर असलेल्या बांधकाम साईटवर काम सुरू आहे. या ठिकाणी ठेवलेले सुमारे ४९ हजार रूपये किमतीचे सेंट्रीग बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना १९ ऑगष्ट रोजी घडली. अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten