नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या बँकांची व नावांची ५३ एटीएम कार्ड्स आडगाव पोलिसांनी एका भामट्याकडून हस्तगत केली आहे. हा भामटा एटीएम कार्ड बदली करून फसवणूक करत होता. या भामट्याकडून लहान रामपुरी चाकूदेखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. वेगवेगळ्या बँकांची व नावांची ५३ एटीएम कार्ड्स हस्तगत याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष हरिश्चंद्र मोहिते (३०) ३०, रा. उल्हासनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत्रा हॉटेलसमोरील एसबीआयच्या एटीएममध्ये दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील दिनेशकुमार राजपत मिश्रा हे सोमवारी गेले होते. एका अज्ञाताने त्यांना मदत करण्याचा बहाण्याने त्यांचा एटीएम पिन पाहिला व हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून घेतले. मिश्रा यांच्या बँक खात्यातून एटीएम कार्डद्वारे २४ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस एटीएम केंद्रावर गेले. या ठिकाणी एक जण मास्क लावून रांगेत उभा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, पोलिसांना त्यावर संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकांचे व नावांचे ५३ एटीएम कार्ड मिळाले.
या भामट्याला पकडण्यात आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शिंदे यांच्यासह पोलिसांनी यश आले आहे. या भामटयाने किती जणांना फसवले त्याच्याबरोबर अजून कोण आहे याचा शोध आता पोलिस घेत आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
ATM Card Change Suspect Arrest