नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील शाळा क्रं. ५६ पाठीमागील मार्गावर धावत्या दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. जगन्नाथ दयाराम बेलदार (६२ रा. धनाजी लग्गड गार्डन जवळ, वनश्री कॉलनी, अंबड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बेलदार मंगळवारी (दि.८) कामानिमित्त पंचवटी भागात गेले होते. शाळा क्र. ५६ पाठीमागील उन्नती हॉस्पिटल समोरून ते आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अचानक चक्कर आल्याने दुचाकीवरून ते पडले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मुलगा अमोल बेलदार यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये महिलेच्या कार्डची आदलाबदल करून ६५ हजाराला गंडा
शिंगाडा तलाव परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये पैसे काढून देण्यासाठी मदतीचा बहाणा करून त्रिकुटाने एका महिलेच्या एटीएम कार्डची आदलाबदल करून ६५ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सुरेखा मोघ्या पाडवी (रा. अग्निशमन केंद्राजवळ, शिंगाडा तलाव) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडवी शुक्रवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास परिसरातील एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. एसबीआय बँकेच्या बुथमधून त्या पैसे काढत असतांना अनोळखी तिघांनी त्यांना गाठले. पैसे काढून देण्यास मदत करण्याचा बहाणा करून भामट्यांनी त्यांच्या एटीएम कार्डची आदलाबदल केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील ६५ हजार ३०० रूपयांची रोकड परस्पर काढण्यात आली असून, मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
ATM Card Change Road Accident Death