नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत तीन महिन्यांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा बुधवारी मृत्यू झाला. मनोज हरिप्रसाद पांडे (५० रा.बालाजी सोसा. शिवाजीनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पांडे गेल्या २४ एप्रिल रोजी आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. औद्योगिक वसाहतीतून ते जात असतांना दुचाकीचा अपघात झाला होता. या घटनेत त्यांच्या डोक्यास व हातापायास दुखापत झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ गंगापूररोडवरील गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. त्यानंतर त्यांना सोहम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. प्रकृत्तीत सुधारणा झाल्याने कुटुंबियांनी त्यांना काही दिवसांपूर्वी घरी नेले असता बुधवारी त्यांची अचानक तब्बेत बिघडल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.
ओमकार नगरमध्ये महिलेची आत्महत्या
२७ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना किशोर सुर्यवंशी मार्गावरील ओमकारनगर भागात घडली. या अश्विनी तुषार जोशी (२७ रा.जय योगेश्वर सोसा. ओमकारनगर वाचनालयाजवळ, म्हसरूळ शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जोशी यांनी बुधवारी (दि.१२) सकाळी आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घरात लोखंडी अँगलला पाळण्याची दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र जोशी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.