नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मायको सर्कल भागात दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. अनिल रामलिंग साखरे (६६ रा.मधुबन कॉलनी, क्रांतीनगर) असे मृत वृध्द दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साखरे गेल्या शनिवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास सिडकोतून ठक्कर बाजार बसस्थानकाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. दक्षिणमुखी हनुमान मंदिर भागात भरधाव दुचाकीस अपघात झाल्याने साखरे गंभीर जखमी झाले होते.
भाऊ सतीश साखरे यांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता गुरूवारी (दि.१) उपचार सुरू असतांना डॉ. गणेश मोटवाणी यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.