नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या छोटा हत्ती टेम्पोसह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका व पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुने नाशिक परिसरातील अमन अजिज सय्यद (रा.बागवानपुरा) यांचा मालवाहू टेम्पो एमएच ०४ डीडी ६२२७ गेल्या शनिवारी (दि.१०) सारडा सर्कल येथील सरगम सोसायटी समोरील नॅशनल उर्दु शाळेच्या भिंतीस लागून पार्क केलेला असतांना तो चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मुंबइनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुसरी घटना गोदाघाटावर घडली. निवृत्ती रघुनाथ चव्हाण (रा.श्रमिकनगर,सातपूर) हे गेल्या गुरूवारी (दि.८) गोदाघाट परिसरात गेले होते. त्यांची स्प्लेंडर एमएच १५ बीवाय ४९३१ साईबाबा मंदिराच्या पाठीमागील पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक नांदुर्डीकर करीत आहेत.
तरूणास दमदाटी, बेदम मारहाण
अशोकस्तंभ भागात पार्किंगमध्ये उभे राहण्यास मज्जाव केल्याने टोळक्याने तरूणास दमदाटी करीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी रोहित नरेंद्र बंब (२२ रा.विश्वा अपा.अशोकस्तंभ) या युवकाने तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंब यांच्या राहत्या विश्वा अपार्टमेट या सोसायटीच्या पार्किंगमध्ये रविवारी (दि.११) काही तरूण उभे होते. यावेळी बंब यांनी येथे उभे राहू नका असा सल्ला दिल्याने ही घटना घडली. संशयित व्यंकटेश मोरे व त्यांच्या सात आठ साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बंब यांना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.