नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी ९४ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरुन नेला. सिडकोतील सावता नगर भागात झालेल्या या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीच्या दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी शरद पोपट घरट (रा.माऊली झेरॉक्स समोर,बजरंग चौक सावतानगर) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरट कुटुंबिय शुक्रवारी (दि.९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ९४ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.
बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
औद्योगीक वसाहतीतील पाईपलाईनरोड भागात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. संतोष गणपत दराडे (रा.सिध्दार्थ अपा.रिलायन्स पंपाजवळ, पाईपलाईनरोड सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दराडे रविवारी (दि.११) अचानक आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने ते बेशुध्द पडले होते. वडिल गणपत दराडे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गावित करीत आहेत.