नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन रोलेट जुगार खेळविणा-या एकावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मोबाईलसह रोकड असा सुमारे १२ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित सुरेश शेळके (रा.साईबाबा मंदिराजवळ, सातपूर कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. सातपूर कॉलनी येथील शिवनेरी गार्डन भागात एक युवक मोबाईलच्या माध्यमातून रोलेट गेम खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.७) रात्री पोलिसांनी सापळा लावून संशयितास ताब्यात घेतले असता तो मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेल्या फन गेम नावाच्या अॅपचा आयडी पासवर्ड ग्राहकांना देवून १ रूपयास ३६ रूपये या दराने पैले घेवून ऑनलाईन रोलेट जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला.
संशयिताच्या ताब्यातून दोन मोबाईल व रोकड असा सुमारे १२ हजार १०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून याप्रक्रणी अंमलदार अनंता महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक खरपडे करीत आहेत.