नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड येथील सायखेडा रोड भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९० हजार रूपये किमतीचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी साधना पोपट आढाव (रा.नारायण बापूनगर, जुना सायखेडा रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आढाव कुटुंबिय रविवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून कपाटातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
४६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
४६ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शिंदे येथे घडली. तुलशीदास नथू कोचरे (रा.शिंदे ता.जि.नाशिक) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. कोचरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोचरे यांनी रविवारी (दि.४) दुपारच्या सुमारास परिसरातील युनायटेड टेरीटेड कंपनी परिसरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कंपनीचे मालक खंडू गिते यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.