नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागातून इको कारसह दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना देवळाली कॅम्प भागात घडली. नवनाथ पांडूरंग चव्हाण (रा.उमराव विहार कॉर्टर दे.कॅम्प) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांची मोटारसायकल एमएच १० एडी ६५६९ गेल्या १६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास कॅन्टोमेंट पार्किंग शेजारील विशाल अयान अॅटोडिल्सच्या बाजूला पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
दुस-या घटनेत गंगापूररोडवरील डॉ. चैतन्य साहेबराव मोगल (रा.भावसार सोसा.पाटील लेन.३) यांची इको कार एमएच १५ सीएम ७७२७ गुरूवारी (दि.६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या बाहेर लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.
पेठरोडवर जुगार अड्ड्यावर कारवाई
पेठरोड भागात उघड्यावर जुगार खेळणा-या सहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या घटनेत सुमारे ८ हजार २८० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने केली. विजय रामू कराळे (रा.लक्ष्मणनगर,पेठरोड),शाम श्रीधर गांगुर्डे (रा.संभाजी चौक,बोराडेलेन म्हसरूळ),विलास फकिरा जाधव (रा.लक्ष्मणनगर),नितीन शामराव अटक (रा.कालिकामंदिरामागे,मुंबईनाका),राजू नारायण खडके (रा.शंकरनगर तवलीफाटा) व राकेश सुभाष ठाकरे (रा.विद्यानगर,म.बादरोड) अशी संशयित जुगारींची नावे आहे.
पेठरोडवरील मेघराज बेकरी परिसरातील उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित वडाच्या झाडाखाली टाईम बाजार व मिलन बाजार नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे आठ हजार २८० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार गौरव खांडरे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.