नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथे महिला अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर तिला डोकावून पहाणे शेजारी राहणा-या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. हा शेजारी बाथरुममध्ये डोकावून पहात असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिकांनी त्याला रंगेहात पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या व्यक्ती गजाआड केले आहे. पवन पंडित असे या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने हे कृत्य केले आहे. या अगोदरही तो असले उद्योग करत होता. या शेजा-याविरुध्द महिलेने पोलिस स्थानकात तक्रार दिली असून त्याच्या विरुध्द भादंवि कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.