नाशिक – शहरात लसीचा तुटवडा कायम असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरण बंद राहणार आहे. शनिवारी (८ मे) शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर लस पुरविण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यातच आता रविवारीही (९ मे) शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याचे नाशिक महापालिकेने सांगितले आहे. परिणामी, नाशकात सलग दोन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. गेल्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण होण्यात अडचणी येत आहेत. अत्यल्प प्रमाणात लस पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळेच केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तरी नागरिकांनी गर्दी करु नये, ऑनलाईन नोंदणी व अपॉईंटमेंट घेऊनच केंद्रावर यावे, असे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे.
दिनांक : ०९-०५-२०२१ रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार!
नागरिकांना सूचित करण्यात येत की उद्या सार्वजनिक सुट्टी ( रविवार ) असल्याने एक दिवस सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.
याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/QkuzOKKQDF— mynmc (@my_nmc) May 8, 2021