नाशिक – शहरात उद्या (शुक्रवार ६ ऑगस्ट) कुठल्या केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस मिळेल याची माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे. त्यानुसार, कोवॅक्सिन हीच लस उपलब्ध राहणार आहे. ही लस पंचवटीतील इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिकरोड येथील जेडीसी बिटको हॉस्पिटल आणि नासर्डी पूल येथील समाज कल्याण विभागाच्या ठिकाणी मिळणार आहे. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांना ही लस मिळू शकेल. मात्र, कोविशिल्ड ही लस उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.