नाशिक – शहरात सझ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, या मोहिमेत नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोविशिल्ड लशीची मोठी अनुपलब्धता आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उद्या (गुरुवार, २६ ऑगस्ट) शहरात केवळ कोवॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे. कोविशिल्ड ही लस मिळणार नाही, तसे महापालिकेने स्पष्ट केले आहे.