नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लस नागरिकांना दिल्या जात आहेत. मात्र, यातील गैरसोय कायम आहे. मंगळवार (२४ ऑगस्ट)च्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेने माहिती जारी केली आहे. त्यानुसार, कोविशिल्ड ही लस सातपूर येथील मायको हॉस्पिटल, हिरावाडी येथील आरोग्य केंद्र आणि नाशिकरोड येथील नवीन बिटको हॉस्पिटल तर कोवॅक्सिन ही लस नासर्डी पूल येथील समाज कल्याण कार्यालय, पंचवटीतील इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि सिडकोतील आरोग्य केंद्रात उपलब्ध राहणार आहे.