नाशिक – शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणातील गैरसोय अद्यापही कायम आहे. कोविशिल्ड लस घेण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. उद्या (१९ ऑगस्ट)ही शहरात कोविशिल्ड ही लस उपलब्ध राहणार नाही. केवळ कोवॅक्सिन ही लस उपलब्ध राहणार आहे. कोवॅक्सिन ही लस नासर्डी पूल येथील समाज कल्याण भवन, सातपूर येथील इएसआयएस हॉस्पिटल, सिडकोतील आरोग्य केंद्र येथे उपलब्ध राहणार आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे.