नाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकांची सुरू असलेली वणवण अद्यापही थांबण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी शहरात मुबलक लस उपलब्ध असताना मंगळवारी (१३ जुलै) मात्र पुन्हा नाशिककरांना लसीच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागणार आहे. मंगळवारी नाशिक शहरात केवळ कोवॅक्सिन हीच लस उपलब्ध राहणार आहे. ज्यांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांच्यासाठी इंदिरा गांधी हॉस्पिटल, इएसआयएस हॉस्पिटल, समाज कल्याण आणि जेडीसी बिटको १ या केंद्रांवर लस उपलब्ध राहणार असल्याचे नाशिक महापालिकेने कळविले आहे.