नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र, ही मोहिम अत्यंत गैरसोय आणि मनस्ताप देणारी ठरत आहे. नागरिकांना लस उपलब्ध होत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. त्यातच काही दिवस लसीकरण बंद असते, काही दिवस कोविशिल्ड लस मिळत नाही तर काही दिवस कोवॅक्सिन. यामुळे नाशिककरांची प्रचंड नाराजी आहे. उद्या (शुक्रवार, १३ ऑगस्ट)च्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकने माहिती दिली आहे. त्यानुसार, शहरात उद्या केवळ कोवॅक्सिन हीच लस मिळेल. पहिला आणि दुसरा डोस घेण्याऱ्यांना ती मिळू शकेल. ही लस पंचवटीतील इंदिरा गांधी हॉस्पिटल, नासर्डी पूल येथील समाज कल्याण भवन, नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटल, सातपूरच्या इएसआयएस हॉस्पिटल आणि सिडकोतील अचानक चौक येथील आरोग्य केंद्र येथे मिळू शकणार आहे. मात्र, उद्या शहरात कोविशिल्ड ही लस मिळणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.