नाशिक – शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसंदर्भात नाशिक महापालिकेने माहिती दिली आहे. उद्या
(रविवार, २५ जुलै) रोजी नाशिक शहरातील लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन नाशिक महापालिकेने आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास प्रत्येक शनिवार आणि रविवार लसीकरण केंद्र बंद राहत आहेत. त्यामुळे नागरिकांची इच्छा असली तरी त्यांना लस घेता येत नाही. त्यामुळे नाशिककरांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.