नाशिक – कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या अवतारामुळे राज्यात काही प्रमाणात पुन्हा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची दखल घेत आता नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनीही आदेश काढले आहेत. हे आदेश नाशिक शहरात लागू राहणार आहेत. लग्न समारंभांसाठी आता केवळ १०० जणांच्या उपस्थितीची मर्यादा राहणार आहे. सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांसाठी १०० जणांनाच उपस्थित राहता येईल. हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये केवळ ५० टक्केच उपस्थितीला परवानगी आहे. मॉल्स, शोरुममधील उपस्थिती आदींबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्तांनी काढलेले आदेश खालीलप्रमाणे