विशेष प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने लागू केलेल्या ब्रेक द चेनच्या आदेशाअंतर्गत नाशिक शहरासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी कोरोना निर्बंधांचे आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासूनच (२८ जून) सुरू झाली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यापुढे कारवाई केली जाणार आहे. तसे स्पष्ट आदेश आयुक्तांनी सर्व पोलिस स्टेशनच्या प्रमुखांना दिले आहेत. तसेच, शहरातील बाजारपेठेत यापुढे पुन्हा पास लागू होणार आहे. बाजारात खरेदी करण्यास जाणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.
पोलिस आयुक्तांचे आदेश असे