नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सध्यस्थीतीत H3N2 या विषाणूचा एकही रुग्ण नसून कोरोनाचे ३३ रुग्ण आतापर्यंत आढळल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली असून त्यात H3N2 विषाणूचे देखील नवे संकट आले आहे.
आतापर्यंत नाशिकमध्ये १० रुग्ण आढळले होते, त्यांच्यावर उपचार करून ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. सध्या तरी शहरात एकही H3N2 विषाणूचे रुग्ण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत असून सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे ३३ रुग्ण असून दोन रुग्णांवर रुग्णालयात तर ३१ रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत. शहरात रोज तीन ते चार रुग्ण आढळत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. नागरगोजे यांनी केले. सर्दी, खोकला, ताप आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन तात्काळ उपचार घ्यावे. असे आवाहन देखील डॉ. नागरजोगे यांनी केले आहे.
Nashik City Corona H3N2 Current Situation Precaution NMC