नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील सिंहस्थनगर भागात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून एकाने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. शरद साखरचंद कुटे (रा. अभिषेक बेकरी मागे,सिंहस्थनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी सुरज विश्वनाथ कुटे (२७ रा.दत्त मंदिरामागे,मोरवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कुटे बुधवारी (दि.२३) सिंहस्थनगर भागात गेला होता. साईप्रेम मेन्स पार्लर समोर तो उभा असतांना संशयिताने त्यास गाठले. यावेळी संशयिताने कुटे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली असता कुटे यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने शिवीगाळ करीत कुटे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या घटनेत कुटे जखमी झाला असून संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक किरण देशमुख करीत आहेत.
तलवारीचा धाक दाखवित दहशत निर्माण करणा-या तडिपारवर कारवाई
सिडकोतील महाकाली चौक भागात तलवारीचा धाक दाखवित दहशत निर्माण करणा-या तडिपारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोद करण्यात आली आहे. सुरज भिकू शर्मा (२४) असे अटक करण्यात आलेल्या तलवारधारी तडिपाराचे नाव आहे. शर्मा याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे.
शहर व जिह्यातून एक वर्षासाठी तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.२३) सायंकाळी तो महाकाली चौकात दहशत माजवितांना मिळून आला. त्याच्या ताब्यात धारदार तलवार आढळून आली असून याबाबत अंमलदार सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी शस्त्रबंदी आणि हद्दपार कारवाई उलंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक अतुल बनतोडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten