नाशिक – येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने तयार पूर्ण केली आहे. तशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सहा केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. ऑनलाईन स्लॉट बुक केलेल्या मुलांनाच लस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० मुलांना लस दिली जाणार आहे. या सहा केंद्रांमध्ये मेरी कोविड सेन्टर (पंचवटी), समाज कल्याण (द्वारका, नाशिक-पुणे रोड), शहर प्राथमिक आरोग्य केंद्र (सिडको), डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय (द्वारका), ESIS हॉस्पिटल (सातपूर) आणि न्यू बिटको हॉस्पिटल (नाशिकरोड) यांचा समावेश आहे. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. त्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुक करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.