नाशिक : वेगवेगळया भागात पार्क केलेल्या फॉर्च्युनर कारसह एक अॅटोरिक्षा चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
खडकाळी भागात राहणारे अझर फारूख शेख (रा.जीपीओ रोड, जन्नत हॉटेल) यांची सुमारे २६ लाख रूपये किमतीची फॉर्च्युनर कार एमएच १५ एफएन ५५५८ गुरूवारी (दि.१८) त्याच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शेळके करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोत घडली. याप्रकरणी अशोक राजाराम (रा.आनंदनगर, पवननगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अशोक राजाराम यांची अॅटोरिक्षा एमएच १५ एफयू १९८२ गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री त्यांच्या घरपरिसरात पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.