नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने शहर बस सेवेत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व सदर नवीन भाडेवाढ हि दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ च्या मध्यरात्रीपासून पासून करण्यात आली आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे.
वाढणारे इंधन दर लक्षात घेता, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता हि भाडेवाढ करण्यात आली आहे. आवश्यक सर्व सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ उशिराने अखेर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेने सांगितले आहे.
यामध्ये वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आलेली आहे. सुखकर, अद्ययावत, सुरक्षित प्रवास नाशिककरांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रवासी नागरिकांनी सिटीलिंकच्या भाडेवाढीच्या निर्णयाला देखील सहकार्य करावे ही विनंती महापालिकेने केली आहे.
सिटीलिंक शहर बससेवेत भाडेवाढ, दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ च्या मध्यरात्रीपासून पासून नवीन भाडेवाढ लागू.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने शहर बस सेवेत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व सदर नवीन भाडेवाढ हि दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ च्या pic.twitter.com/g5Q0Xb5KUy
— mynmc (@my_nmc) February 14, 2023
Nashik City bus Ticket Fare Hike from Today