नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना सिटी बसचे पास उपलब्ध व्हावेत यासाठी १३ जूनपासून शहरात आणखी ४ ठिकाणी बस पास कार्यालय सुरू होत आहेत. सद्यस्थितीत सिटीलिंकची ४ बस पास केंद्र सुरू होत आहेत. आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणखी ४ ठिकाणी केंद्र सुरू होत आहे. त्यामुळे एकूण ८ ठिकाणी विद्यार्थ्यांना बस पास मिळू शकणार आहे.
उद्यापासून (१३ जून) सुरू होणारे ४ बसपास केंद्र असे
१. सिटी लिंक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल समोर, त्र्यंबकरोड
२. भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव
३. केटीएचएम महाविद्यालय, गंगापूररोड
४. एचपीटी महाविद्यालय, कॉलेजरोड
https://twitter.com/CitilincNashik/status/1533715049604296709?s=20&t=O4O9TI40R_SQ9flMrhZDag