गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रंगीत तालिम यशस्वी; नाशिक शहर बससेवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून

by India Darpan
जून 23, 2021 | 12:00 pm
in स्थानिक बातम्या
0

विशेष प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या शहर बससेवेची सध्या रंगीत तालिम सुरू असून ती यशस्वी झाली आहे. येते काही दिवस आणखी अशाच प्रकारे रंगीत तालिम घेतली जाणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात नियमित बससेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ९० टक्के काम पूर्ण होत आले आहे. तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोचे काम पूर्णत्वाकडे आहे. बसेस सुरू करण्याच्या दृष्टीने सध्या ट्रायल रन (रंगीत तालिम) घेण्यात येत आहे. मनपाच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू होण्याची शक्यता आहे.
बससेवेचे मार्ग असे
१) तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हील, सातपूर, अशोकनगर श्रमिकनगर
२) तपोवन, सिम्बायोसिस कॉलेज मार्गे पवन नगर, उत्तम नगर
३) तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका नागजी, इंदिरानगर, वनवैभव
४) सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखा नगर, महामार्ग, म्हसरूळ, बोरगड.
५) तपोवन ते भगूर मार्गे शालिमार, द्वारका बिटको, देवळाली कॅम्प
६) नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका
७)नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे
८) नाशिक रोड ते निमाणी  मार्गे जेल रोड टाकी, सैलानी बाबा, नांदूर गाव, नांदूर नाका, तपोवन
९) नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी
या ९ मार्गावर २४० बस थांबे असणार आहेत. जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्या पासून ही बस सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन असून याबाबतच्या कामकाजाचा २५ जून रोजी सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या बसेस साठी नियुक्त होणारे कंडक्टर व ड्रायव्हर  त्याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित लोकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात हे नियोजन
सिटी बसच्या अहवालानुसार हाय पेयींग रूटवर या बस धावणार आहेत. भविष्यात शहर बस बरोबरच ओझर विमानतळ, त्र्यंबकेश्वर, कसारा लोकलला जोडणारी बस सेवा सुरू करण्याचा नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक दर्शन सारखे पर्यटन स्थळांवर  व सुला वाईन, बोट क्लब इत्यादी ठिकाणी लवकरच रूट तयार करून बस सुरू करण्याचा विचार आहे.
शॉपिंग मॉल
नाशिक महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तपोवन व नाशिकरोड डेपोच्या आवारात शॉपिंग मॉल उभारण्याचेही महापालिकेच्या विचाराधीन आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रस्ते, वस्त्या-वाड्यांच्या नावांतून जात होणार हद्दपार; आता येणार ही नावे

Next Post

मनमाड – मुंबई पंचवटी विशेष एक्सप्रेस या तारखेपासून होणार सुरु, रेल्वेने घेतला निर्णय

India Darpan

Next Post
madhay railway

मनमाड - मुंबई पंचवटी विशेष एक्सप्रेस या तारखेपासून होणार सुरु, रेल्वेने घेतला निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011