नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्यावतीे चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक ही बससेवा सकाळपासून ठप्प झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकल्याने सर्व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. परिणामी, शहर वाहतूक बससेवा बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
एसटी महामंडळाकडून नाशिक महापालिकेने सिटीबससेवा ताब्यात घेतली. त्यानंतर आतापर्यंत अनेकवेळा कर्मचाऱ्यांना अचानक संप पुकारावा लागला आहे. प्रत्येकवेळी पगार हेच कारण आहे. पगार वेळेवर होत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. आताही गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यामुळे बससेवेचे सर्व कंत्राटी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच त्यांनी थेट संप पुकारला आहे. या सर्व प्रकारात मात्र, प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. दररोज सिटीबससेवेचा हजारो प्रवासी लाभ घेतात. खासकरुन सकाळच्यावेळी प्रवाशांची संख्या मोठी असते. आणि आज सकाळपासून रस्त्यावर एकही बस धावलेली नाही.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
⭕ *पाथरेचा लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात*
यासाठी मागितली तब्बल ५० हजाराची लाच
https://t.co/M3WABCMPNB#indiadarpanlive #nashik #sinner #gramsevak #acb #trap #bribe #corruption— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 13, 2023
Nashik City Bus Service Citilinc Employee Strike