नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सिटी लिंक बसचे अपघात वाढले असून वेगवेगळ््या भागात झालेल्या अपघातांमध्ये आठ वर्षीय चिमुरडीसह ६७ वर्षीय वृध्द जखमी झाले. याप्रकरणी आडगाव आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात बसचालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासूळ ता. देवळा येथील महादू काशिनाथ खैरणार (६७) हे वृध्द मंगळवारी (दि.६) महामार्गावरील जत्रा हॉटेल कडून आडगावच्या दिशेने पायी जात असतांना त्यांना सीटीबसने (एमएच १५ जीवाय ८०१७) धडक दिली. हा अपघात अंबिका टेक्सटाईल्स समोरील सर्व्हिसरोडवर झाला. या अपघातात खैरणार जखमी झाले असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.
दुसरा अपघात वर्दळीच्या शालिमार भागात झाला. या अपघातात खुशी प्रशांत जाधव (८ रा.परदेशी हॉस्पिटल मागे,खडकाळी) ही बालिका जखमी झाली. शालिमारच्या दिशेने जाणाºया बालिकेस खडकाळीकडून भरधाव आलेल्या एमएच १५ जीव्ही ७७०५ या सीटीबसने धडक दिली. या अपघातात बालिकेच्या पायास गंभीर दुखापत झाली असून तिची आई विद्या जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक ढमाले करीत आहेत.
नाशिक शहरातून तीन दुचाकी लांबवल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून वेगवेगळ््या भागातून तिन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात दोन मोटारसायकली एकाच इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेल्या.
खडकाळी भागात राहणारे वसीम शाहिद शेख (रा.गैबनशहा बाबा दर्गाजवळ) यांची एमएच १५ एडी ९६६६ मोटारसायकल गेल्या मंगळवारी (दि.६) त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक ढमाले करीत आहेत. दुसरी घटना नाशिक पुणा रोडवरील पौर्णिमा बस स्टॅण्ड भागात घडली. काठेगल्लीतील सागर पांडूरंग गोतरणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोतरणे व त्यांचे मित्र किरण थोरात ११ नोव्हेंबर रोजी पौर्णिमा स्टॉप भागात गेले होते. अविनाश हॉटेल मागील सुरेंद्र पटेल यांच्या जुन्या इमारतीत पार्क केलेल्या एमएच १५ सीजे २२४१ व एमएच १५ एवाय २७८१ चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
Nashik City Bus Road Accident 2 Injured
Crime Police FIR Complaint Citilinc