नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाशिवरात्री निमित्त सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्या, शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी सिटीलिंकच्या विशेष फेऱ्या राहणार आहेत.
सिटीलिंक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने तपोवन आगरातून १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बस फेर्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात तर नाशिकरोड आगारतून १० बसेसच्या माध्यमातून ६० बसफेर्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित बसफेर्यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीनिमित्त तपोवन आगारातून ६ बसेसच्या माध्यमातून ४८ तर नाशिकरोड आगारातून ४ बसेसच्या माध्यमातून ३२ अश्या एकूण १० जादा बसेसच्या माध्यमातून ८० जादा बसफेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जादा ८० बसफेर्या व नियमित १६६ बसफेर्या अश्या एकूण २४६ बसफेर्यांचे नियोजन महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.
Nashik City Bus Mahashivratri Trimbakeshwar